
‘महादेवी’ अखेर कोल्हापूरच्या वाटेवर! अनंत अंबानींच्या ‘वंतारा’ची वैद्यकीय मदत सुरूच राहणार
अनंत अंबानी यांच्या ‘वंतारा’कडून वैद्यकीय काळजी सुरू ठेवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, कोल्हापुरात ‘महादेवी’ या नावाने लोकप्रिय असलेली ‘माधुरी’ ही हत्तीण आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहे. उच्चाधिकार समितीने ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार माधुरीला शहरात परत आणण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती वंताराने गुरुवारी दिलेल्या निवेदनात दिली. वंताराने दिलेल्या माहितीनुसार, उच्चाधिकार समितीने

















































